नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कदम यांचा दहिवड येथे सत्कार

0
50

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; दहिवड शाळेचे माजी विद्यार्थी मच्छिंद्र कदम यांची नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून निवड झाल्याने शाळेच्या आवारात आज त्यांचा गावकऱ्यांनी सत्कार आयोजित केला होता.

दहिवड येथील मित्र मेळावा ग्रुप , ग्रामपंचायत तसेच लक्ष्मीबाई देवरे विद्यालय जिजामाता माध्यमिक विद्यालय च्या वतीने आज कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यावेळी ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येये उपस्थित होते. गावासाठी हा क्षण अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी काढले.

यावेळी कदम बोलताना म्हणाले की शेतकऱ्यांच्या मुलाने शेती करून शिकणे फार अवघड आहे. तसेच त्यांच्याकडे सध्या नंदुरबार जिल्ह्याचा माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कारभार आहे. त्यांना महामहिम राज्यपाल कोश्यारी साहेब यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला आहे.

या कार्यक्रम प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे दहिवड चे सरपंच आदिनाथ ठाकूर उपसरपंच मनीष ब्राह्मण कर ग्राम विकास अधिकारी पोलीस पाटील दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील नागरिक यावेळी हजर होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here