Shirdi : साईबाबांच्या दर्शनासाठी 25 एप्रील ते 15 जुन 2023 या काळात शिर्डीत आलेल्या 26 लाख भाविकांनी 47 कोटी 78 लाख 83 हजार 560 रूपयांचे घसघशीत दान साईंच्या झोळीत अर्पण केले. तर सशुल्क दर्शन व आरती द्वारे 11 कोटी 55 लाख 6 हजार 997 रूपयांचे उत्पन्न साईसंस्थानला मिळाले.
जवळपास संपूर्ण वर्षभर फक्त राज्यातीलच नव्हे तर देशभरातील विविध ठिकाणाहून असंख्य भाविक हे शिर्डी मध्ये साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत असतात यावेळी अनेक भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर देणगी विविध स्वरूपाने साईंच्या चरणी अर्पण करण्यात येत असते यामुळेच देशात तिरुपती बालाजी नंतर श्री साई संस्थान हे दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखलं जातं.
साईंच्या चरणी दान 25 एप्रील ते 15 जुन दरम्यान – 25 कोटी 89 लाख 70 हजार 382 देणगी, दक्षिणा पेटीमध्ये – 9 कोटी 83 लाख 32 हजार 842 रुपये डेबिट-क्रेडिट कार्ड द्वारे – 5 कोटी 15 लाख 28 हजार 755रुपये, ऑन लाईन देणगी जवळपास 3 कोटी 34 लाख 44 हजार 543, चेक व डीडी द्वारे – 1 कोटी 82 लाख 61 हजार 806, मनी ऑर्डर द्वारे – 27 लाख 37 हजार 19रुपये तर सोने 2193.440 ग्रँम म्हणजेच 1 कोटी 17 लाख 59 हजार 125चे सोने, चांदी 52121 ग्रँम जवळपास 28 लाख 49 लाख 88 दागिने, सशुल्क दर्शन पास द्वारे 8 कोटी 30 लाख 57 हजार 997 तर सशुल्क आरती पास द्वारे 3 कोटी 24 लाख 49 हजार रुपये आले आहेत.
दरम्यान या काळामध्ये 22 लाख 41 हजार 300 भाविकांनी साईप्रसादाचा लाभ घेतला आहे. तर दर्शन रांगेद्वारे या काळात 21 लाख 9 हजार 523 भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले.
साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून येत असलेल्या हजारो भाविकांनी साई दर्शनानंतर साईबाबांच्या झोळीत भरभरून दानही अर्पण करतात. साईभक्तांच्या दानातून साईसंस्थान देशातील क्रमांक दोनचे देवस्थान बनले आहे. याच दानातून शिर्डीत भाविकांसाठी पायाभुत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम