
देवळा ; देवळा तालुका कृषी विभागाच्या वतीने शनिवारी(११) रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्याचे
अन्नातील आहाराचे महत्व या कार्यक्रमा विषयी जनजागृती करण्यात आली.

जिल्हा परिषद कृषी विभागाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 म्हणून घोषित केले आहे. .त्यानिमित्ताने आज देवळा येथील दुर्गा माता मंदिराच्या सभागृहात या कार्यक्रमाची जनजागृती करण्यात येऊन उपस्थिती महिलांना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
तालुक्यात लवकरच तृणधान्यावर आधारित पाककला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत बचत गटातील महिलांसह, सखी मंचच्या महिलांना आमंत्रित करण्यात येणार आहे .
यात बाजरी ,ज्वारी ,तांदूळ ,मका ,नागली ,ओट्स यावर आधारित कोणताही एक पदार्थ घरूनच बनवून आणावा. सहभागी स्पर्धकांनी बनविलेल्या पदार्थांचे कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुण्यांकडून योग्य परीक्षण करून यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक दिले जातील. या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे ,मंडळ कृषी अधिकारी संजय वाघ यांनी केले आहे. यावेळी कृषी विभागाचे महेश देवरे , पर्यवेक्षक श्रीमती जाधव , कृषी सहाय्यक श्रीमती व्ही पी पवार,श्रीमती एम आर निकम ,श्रीमती दिपाजंली भामरे यांनी यशस्वी नियोजन केले होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम