ज्येष्ठ किर्तनकार ह भ प बाबा महाराज सातारकर Baba Maharaj Satarkar यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर Rukmini Satarkar यांचे निधन झाले. नेरुळमध्ये त्यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.रूक्मिणी सातारकर यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येईल. अशी माहिती सातारकर कुटुंबियांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक शिवराम पाटील यांनी दिली आहे.
बाबा महाराज सातारकर यांच्या अध्यात्माच्या विचार प्रसाराच्या कार्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिले. बाबा महाराज सातारकर यांनी १९८३ पासून संतांच्या गावी दरवर्षी कीर्तन सप्ताह आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. यात त्यांनी भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर आदी ठिकाणी कीर्तन सप्ताहांचे आयोजन करण्यात येतात.
HSC-SSC Exam Update | बोर्डाने घेतला मोठा निर्णय
त्यांनी जनसेवा करण्यासाठी चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेचीही स्थापना केलेली आहे. या माध्यमातून भाविकांना वैद्यकीय सुविधाही पुरवण्यात येते. बाबा महाराज सातारकर यांच्या धार्मिक कार्यात त्यांच्या पत्नी रुक्मिणी उर्फ माईसाहेब यांचीही मोलाची साथ होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम