द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; बागवणी कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या सुधारित वाणाची माहिती कृषि विज्ञान केंद्र आणि देवळा ॲग्रोच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहचल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी मदत होत असल्याचे प्रतिपादन कृषी संशोधन केंद्राचे संचालक डॉ . मेजर सिंग यांनी येथे केले.
कृषि विज्ञान केंद्र , मालेगांव , बागवणी कृषी संशोधन संचालनालय , राजगुरुनगर ( पुणे ) आणि कृषि विभाग ( महाराष्ट्र शासन ) यांच्या संयुक्त विद्यमाने कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्याकरिता शास्त्रीय कांदा लागवड ‘ या विशेष सत्राचे देवळा येथे आयोजन करण्यात आले होते . यावेळी ते बोलत होते . चर्चासत्राप्रसंगी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ . विजय महाजन, धुळ्याचे कृषि महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा . श्रीधर देसले यांनी शेतकऱ्यांना कांदा पिकातील वाढत्या समस्यांच्या विषयाच्या अनुषंगाने सखोल मार्गदर्शन केले .
शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सुधारित वाण , योग्य कृषि निविष्ठा वापर , बाजारभ आकलन आणि मुल्यसाखळी विकसित होण्यास विशेष मदत होणार आहे . सोबतच कृषि विज्ञान केंद्र आणि संशोधन संस्थाच्या मदतीने विविध संशोधन व प्रयोग शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचण्यास ‘ देवळा ॲग्रो ‘ सारख्या शेतकरी उत्पादक कंपनी दुवा ठरत असल्याचे प्रतिपादन कृषि तंत्रज्ञान उपयोजन संस्थचे संचालक डॉ . लाखन सिंग यांनी केले .
आजमितीला ‘ देवळा ऍग्रो ‘ शेतकरी उत्पादक कंपनीने ‘ मुलकन ‘ सारखे सुधारित वाण बाजारात आणले आहे . शेतकरी उत्पादक कंपनीने देखील आता शेतकऱ्यांना बीज ते बाजार ‘ सर्व सुविधा एका छताखाली आणून सोबत शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक नवा पायंडा सुरु केल्याचा विश्वास देवळा अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन केदा आहेर यांनी यावेळी व्यक्त केला . यावेळी नाशिक जिल्ह्यातील नऊ पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक आणि शेतकरी उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवळा अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले .
फोटो ओळ ; देवळा येथे आयोजित शास्त्रीय कांदा लागवड चर्चासत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मेजर सिंग व्यासपीठावर केदा आहेर, कृषी अधिकारी सचिन देवरे आदी तर दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित शेतकरी वर्ग (छाया – सोमनाथ जगताप )
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम