बाजार समिती निवडणुका पुन्हा लांबणीवर

0
36

नाशिक : सहकार क्षेत्रातील महत्वाच्या असणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या मात्र या निवडणुकांना आता स्थगित केल्या आहेत. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आजपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार होती मात्र, ग्रामपंचायतींत नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा अंतिम यादीत समावेश करावा यासाठी निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १५ मार्च २०२३ पर्यंत स्थगित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असल्याची माहिती आहे. न्यायालयाने दिलेले हे आदेश नाशिक बाजार समितीपूर्ते मर्यादित नसून जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांना देखील लागू आहेत.

नाशिक जिल्ह्यातील तब्बल १४ बाजार समिती मध्ये निवडणुक प्रक्रिया सुरू झाली. अंतिम मतदार यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली. २९ जानेवारी २०२३ रोजी बाजार समितीसाठी मतदान तारीख जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी बाजार समित्यांकडून तयारी सुरू होती, सर्वच राजकिय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी तसेच बैठकांचे सत्र सुरू आहे. निवडणुकीची लगबग सुरू असताना नाशिक तसेच कोल्हापूर बाजार समितीची निवडणूक १५ मार्च २०२३ पर्यंत स्थगित करण्याचे न्यायालयाने आदेश दिले.

नाशिक बाजार समितीच्या तीन तालुक्यांतील बारा ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. नवनिर्वाचित सदस्य बाजार समिती चे मतदार असतात. यामुळे हे नाव समाविष्ट करण्यासाठी नाशिक बाजार समितीबाबत दिलेले आदेश जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांनाही लागू झाले. या बाजार समितीच्यां कार्यक्षेत्रातील सदस्य मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. यामुळे हे सर्व नाव आता घेतली जाणार आहे.

निवडणुक प्रक्रिया स्थगित
या संभ्रमावस्था असताना निवडणुक प्रक्रिया कोठेही थांबलेली नसल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून काल स्पष्ट केले होते मात्र आदेश आल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. याबाबत सहकार प्राधिकरणाकडून आदेश प्राप्त झाले बाजार समितीची निवडणुक प्रक्रिया
स्थगितीचा अध्यादेश निघाला आहे.

नागपूर येथील अधिवेशनात मतदार नसलेल्या शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवता येणार आहे. याबाबतच्या सुधारित विधेयकाला विधिमंडळात मंजुरी मिळाली याबाबतचा अध्यादेश निघणार असल्याने या अध्यादेशात नवीन ग्रामपंचायती सदस्यांची नावे अंतिम यादीत समाविष्ट करावीत, असे आदेश रात्री उशिरा सहकार विभागाकडून प्राप्त झाले. दरम्यान,नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकही दि.15 मार्च 2023 पर्यंत स्थगित करण्याचे न्यायालयाने आदेश दिले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here