मुंबई – कोरोना निर्बंधानंतर तब्बल दोन वर्षांनी साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहत आहे. अनेक ठिकाणी घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात दर्शनासाठी गर्दी होत आहे. मुंबईचे दैवत असलेल्या लालबागच्या राजाला मात्र पहिल्या दिवसापासूनच गर्दी होती.
लालबागच्या राजाच्या चरणी दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने दान टाकतात. तसेच दानपेटीतील रकमेची मोजणी ही दरवर्षी गणेशोत्सवानंतर केली जायची. यावर्षी मात्र पहिल्या दोन दिवसांपासून दररोज येणाऱ्या दानाची मोजणी करण्यात येत आहे. आतापर्यंत पहिल्या पाच दिवसांतच लालबागच्या राजाला तब्बल अडीच कोटी रुपयांची देणगी दानपेटीत जमा झालेली आहे. केवळ रोखेचा विचार केला, तर ही देणगी २ कोटी ४९ लाख ५० हजार रुपये इतकी आहे.
फक्त रोख रक्कम नाही, तर पाच दिवसांत सोने आणि चांदीच्या वस्तूही मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. आत्तापर्यंत सुमारे २५० तोळे सोने व २९ किलो चांदी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आलेली आहे. येत्या काही दिवसात होणारी गर्दी पाहता ह्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम