वैभव पगार
म्हेळूस्के :पेठ तालुक्यातील शेतकरी बांधवांना
विजपंपापसाठी लोड सेडिंग मुक्त पूर्णवेळ वीज देण्यात यावी. ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 75 हजार मदत शेतकऱ्यांना करावी अशी मागणी करण्यात आली.
तालुक्यातील वनपट्टे प्लाट धारकांनाही नुकसान भरपाई चा लाभ देण्यात यावा अग्निपथ योजना रद्द करावी, जीवनावश्यक वस्तूंवर लावलेला GST कर रद्द करण्यात यावा या संदर्भात पेठ तालुका काँग्रेस कमिटी तर्फे नायब तहसीलदार पेठ यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुअध्यक्ष विशाल जाधव, शहरअध्यक्ष याकूब शेख ,विलास जाधव, संदीप भोये,हरिदास भुसारे, सोशल मीडिया प्रमुख संजय भोये, विकास सातपुते, दिनेश भोये, उमेश भोये, प्रकाश गाडर आदी. पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम