मुंबई – पंढरपुरात आषाढी एकादशीची तयारी पूर्ण झाली असून त्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आषाढीच्या दिवशी पंढरपुरात स्वच्छ्ता आणि आरोग्याबाबत कुठलीही हयगय नको. तसेच मुख्यमंत्री व महत्त्वाच्या व्यक्तींपेक्षा वारकरी, दिंड्या यांच्याकडे जास्त लक्ष द्या, असा आदेश त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. बैठकीत पुण्याचे विभागीय आयुक्त, सोलापूरचे जिल्हाधिकारी, सोलापूर व पंढरपूरचे पोलिस अधिकारी, मुख्य सचिव व इतर अधिकारी उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षे कोरोनामुळे वारीवर निर्बंध होते, त्यामुळे यंदा वारकरी उत्साहात आहे. आषाढीत मोठी गर्दी होण्याची शक्यता म्हणून योग्य नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. स्वच्छ्ता, आरोग्य, वाहतूक व्यवस्था, रस्ते सफाई, आदि गोष्टी चांगल्या झाल्या पण त्यावर जास्तीत जास्त भर देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. गरज भासल्यास बाहेरून मदत घ्या पण कुठलीही हायगय ह्यात चालणार नाही. पोलिस मनुष्यबळाचा वापर करा, अश्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पंढरपूरला आषाढीला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी
यावेळी वाहतूक व्यवस्था चांगली असावी, खड्डे नकोत. यासाठी निधी कमी पडू देणार नाही. असे आश्वासन दिले. गणपतीला जशी कोकणात टोलमाफ होते, तशीच टोलमाफी आषाढीत पंढरपूरला जाण्यासाठी देण्यात येईल. ४७०० एसटी बसेस सोडण्यात येईल, आवश्यकता असल्यास आणखीन बसेस सोडण्यात येतील. असेही त्यांनी सांगितले.
पहिल्यांदाच आषाढी महापुजेचा मान
माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला यंदा विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. म्हणूनच यंदा आपण कुटुंबासोबत महापूजेला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम