पश्चिम बंगालचे नाव बदलण्याची ममता बॅनर्जींची पंतप्रधानांकडे मागणी

0
87

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

द पॉइंट प्रतिनिधी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीत त्यांनी पश्चिम बंगालचे नाव बदलण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असल्याचं बोललं जातंय.

ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कट्टर विरोधक समजल्या जातात. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक काळात मोदी-ममता बॅनर्जी यांच्यातील वातावरण मोठ्या प्रमाणावर तापले होते. ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्याच्या दृष्टीने भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांच्या सभा पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विजय मिळवत भाजपच्या अपेक्षांवर पाणी फिरवले. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने सर्वांचेच लक्ष वेधले गेले होते. परंतु, ही राजकीय भेट नसल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. ममता बॅनर्जी यांच्या स्पष्टीकरणानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला.

ममता बॅनर्जी यांनी मोदी यांची भेट घेतल्यावर त्यांना कुडता आणि मिठाई देखील भेट दिली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळी नवरात्रानंतर पश्चिम बंगाल भेटीचे निमंत्रण दिले. तसेच जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या कोल ब्लॉकच्या उदघाटनाचे देखील निमंत्रण दिल्याचे बोलले जातेय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे यावेळी पश्चिम बंगाल साठी १३५०० कोटींच्या निधीची मागणी देखील केली.
ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालचे नाव बदलण्याच्या मागणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कसलेही स्पष्ट उत्तर दिले नसल्याचे बोलले जातेय. दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेणार असल्याचं सांगण्यात येतंय.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेटीत काय चर्चा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचे नाव बदलण्याची मागणी का केली? आणि नाव बदललेच तर कोणते नाव? हे मात्र स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या या आणि इतर मागण्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here