ई पीक पाहणी महाविकास आघाडी सरकारचा व्यापक प्रकल्प – थोरात

2
24

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; राज्यात महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेला ई- पीक पाहणी हा महाराष्ट्रासाठी एक व्यापक प्रकल्प ठरणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

आज याबाबत अधिक माहिती देताना नामदार थोरात म्हणाले की, शेतकर्‍यांच्या सात- बारा वर पीक पाहण्याची अचूक नोंद होण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ‘ माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पिक पेरा ‘ ही मोहीम हाती घेतली आहे. या प्रकल्पास राज्यभरातील शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज पर्यंत १८ लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड केले असून या शेतकऱ्यांनी ह्या ॲपवर पिक पाहणी देखील नोंदवली आहे.

महाराष्ट्रात राबविण्यात येणारा हा व्यापक प्रकल्प राज्यातील प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पिकाची माहिती स्वतच भरणे शक्‍य होणार आहे. आताच्या डिजिटल युगात शेतकऱ्यांना सहज पारदर्शक पद्धतीने आपल्या पिकाची नोंदणी करता येणार आहे.

जमीन महसूल कायद्यानुसार जमिनीच्या उतारावर पिकाची नोंद करण्याची पद्धत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य आहे. शिवाय या पीक नोंदीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणे देखील सुलभ होणार आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे.

पिक पाहणी मोबाईल ॲप मुळे शेतकऱ्यांना स्वतःच पिकवत असल्या पिकाची माहिती ॲप मध्ये भरणे सोपे होते. ई पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हा निहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समाजात मोठी मदत होणार असल्याचेही महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असून यामुळे शेतकरी अधिक सक्षम होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here