जळगाव: जिल्ह्यातील रावेर तालुक्यात आज (ता. ८) वादळाचा पुन्हा तडाखा बसला असुन तापी पट्याच्या गावांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. सुमारे पाचशे शेतकऱ्यांचे सातशे हेक्टरच्या वर ७५ कोटीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
रावेर तालुक्यात आलेल्या नैसर्गिक संकटामुळे केळी पूर्ण भुईसपाट झाली आहे. यामुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे. रावेर तालुक्यात दुपारी साडे चारच्या दरम्यान वादळाला सुरुवात झाली. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळुन पडले. अनेक ठिकाणी महावितरणच्या तारांवर झाड पडल्याने अनेक गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. या आलेल्या वादळाचा सर्वाधिक फटका केळी पिकांना बसला असुन अनेक गावांतील घरांवरील पत्रे देखील उडाल्याचे वृत्त आहे. अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी वर्ग कमालीचा हवालदील झाला आहे
.या गावांना बसला वादळाचा फटका
रावेर तालुक्यात दुपारी आलेल्या वादळामुळे सर्वाधिक फटका धामोडी व सिंगत गावांना बसला असुन त्या खालोखाल सुलवाडी, कोळदा, वघाडी, सुलवाडी, कांडवेल, शिंगाडी या तापी पट्याला लागून असलेल्या गावांना वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम