एखादं गाव म्हटलं की तुमच्या मनात कोणते चित्र उभं राहिल? मातीची घरं, कच्चा रस्ता, शेतं आणि दगड, चूलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिला, गवत वाहून नेणारे मजूर… इ. गेल्या काही वर्षांत खेड्यांचे चित्रही झपाट्याने बदलत असले, तरी शहरांच्या तुलनेत खेडी थोडी मागासलेलीच दिसतात. जगातील प्रत्येक गाव असे नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चीनमध्ये असे एक गाव आहे, जिथे राहणारे लोक खूप श्रीमंत आहेत. या गावाचे नाव हुआझी गाव आहे, जे जियांगयिन शहराजवळ आहे.
चीनच्या उत्तर किनाऱ्याजवळ वसलेले जियांगयिनजवळ हुआझी गाव आहे. हे संपूर्ण चीनमधील सर्वात श्रीमंत गाव मानले जाते. शेतीवर आधारित या गावात सुमारे 2 हजार लोक राहतात आणि त्यांचे प्रत्येकाचे वार्षिक उत्पन्न अंदाजे 80 लाख रुपये आहे. यशस्वी समाजवादी गावाचे मॉडेल म्हणून ओळखले जाते. सुरुवातीच्या काळात गाव तसे नव्हते.
असा बदलला चेहरामोहरा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1961 मध्ये जेव्हा या गावाची स्थापना झाली तेव्हा इथली शेतीची अवस्था खूपच वाईट होती. गावाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या समितीचे अध्यक्ष असलेल्या वू रेनवाओ यांनी या गावाचा चेहरामोहराच बदलून टाकला. गावाची पाहणी करून त्यांनी मल्टी सेक्टर इंडस्ट्री कंपनी स्थापन केली. मग त्यांनी सामूहिक शेतीची पद्धत विकसित केली. यासोबतच त्यांनी 1990 मध्ये शेअर बाजारात कंपनीची नोंदणी करून घेतली. गावातील लोकांना कंपनीत भागधारक बनवले.
शेतकऱ्यांकडे आलिशान बंगले
येथे राहणारे शेतकरी आलिशान घरे, महागडी वाहने आणि अनेक लक्झरी सुविधांचा आनंद घेतात. कोणत्याही मेट्रो सिटीपेक्षा कमी न वाटणाऱ्या या गावात रस्ते, पाण्यापासून सर्व गोष्टींची व्यवस्था आहे. गावात पोलाद, रेशीम आणि प्रवासी उद्योग विकसित झाले आहेत. या कंपन्यांमधील नफ्याचा वाटा भागधारक रहिवाशांमध्ये विभागला जातो.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम