कृषी प्रतिनिधी : सद्या शेतकऱ्यांचे लक्ष हे मान्सूनच्या प्रवासाकडे लागून आहे. राज्यात पावसाचे आगमन कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे, मान्सून 27 मे ला केरळ मधे दाखल होईल, असं सांगण्यात येत होते मात्र (Monsoon) अजूनही मान्सून केरळ मधे दाखल झाला नाही. त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत असल्याचे जाणवत आहे. मान्सून पूर्व अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. (Be careful Heavy rains hit ‘this’ districts tomorrow ..!)
राज्यातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने मुंबई उपनगरामधे हजेरी लावली असल्यामुळे उकाड्यापासून पासून तूर्तास सुटका मिळाली आहे. पावसामुळे वातावरण सध्या गार झाले आहे. मागील काही दिवसांपासुन श्रीलंकेत मान्सून पोहचला आहे. हवामानातील बदलामुळे मान्सून चा प्रवास काहीसा मंदावला असला तरी शेतकरयांना वेळेवर येण्याची आस आहे. 27 मे पर्यंत मान्सून केरळ मधे हजेरी लावणार होता पण सध्या तो श्रीलंकेतुन पुढे निघाल्याने येत्या 72 तासांमध्ये केरळ मधे दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. येणाऱ्या बातम्यांनी शेतकऱ्यांच्या नजरा सध्या मान्सूनच्या केरळ मधील आगमनाकडे लागून आहे.
मान्सून ने सध्या लक्षद्वीप, मालदीव बेटांवरती तसेच दक्षिण अरबी समुद्र या भागांमध्ये हजेरी लावली आहे. मान्सून ला वातावरण अनुकूल असल्यामुळे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात केरळ मध्ये दाखल होईल अशी शक्यता आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील मान्सून पूर्व पाऊस महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांना झोडपण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उद्या (30 मे रोजी) महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभाग आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना हवामाना विभागा मार्फत यलो अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मराठवाड्यातील परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड व हिंगोली या जिल्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 30 व 31 तारखेला पाऊस या जिल्ह्यांमध्ये हजेरी लावेल. असा अंदाज हवामान विभागा मार्फत देण्यात आला असून . मान्सून केरळ मध्ये उशिरा दाखल झाल्यामुळे आता मॉन्सूनचे आगमन महाराष्ट्रातही उशिरा होण्याची शक्यता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम