मागील काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि इतरही शेतकरी वर्ग सरकारी धोरणांमुळे प्रचंड अडचणीत सापडला आहे आणि या शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी आम्ही रस्त्यावर उतरायचा निर्णय घेतला आहे आणि त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे अशी माहिती किसान युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी दिली.
कांद्याचे भाव सातत्याने कोसळत असून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखा पर्याय निवडलाय. परंतु निर्ढावलेल्या यंत्रणेला पाझर सुद्धा फुटत नाहिये.
सत्ताधारी पक्षाचे असो किंवा विरोधक असोत ‘शेतकर्यांच्या समस्यांवर’ कोणीही बोलायला तयार नाही. राज्यसरकार केंद्र सरकार कडे बोट दाखवतेय आणि केंद्र सरकार राज्याकडे हात दाखवून मोकळे होतेय,
अशावेळी आता शेतकऱ्यांच्या पोरांनीच आपल्या ‘शेतकरी बापासाठी’ बोलले पाहिजे” अशी भूमिका घेत किसान युवा क्रांती संघटनेने शेतकरी संघटीत होण्यासाठी जागृती निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि म्हणुनच दिनांक 31 मे रोजी सायंकाळी सहा वाजता चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी पक्ष-संघटना असे सगळे भेद बाजूला ठेवून सर्व शेतकऱ्यांनी या मेळाव्याला उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
त्यावेळी किसान युवा क्रांतीचे चांदवड तालुकाध्यक्ष अजय यशवंते,शारुख इनामदार.
राकेश पुरकर,मयुर भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम