5 पैसे किलो कांद्याला दर व्यापाऱ्यांनो शेतकऱ्यांची चेष्टा थांबवा ; भारती पवारांच्या कागदी घोड्यांचा फायदा कोणाला ?

0
13

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : कांदा या पिकाने अनेक सरकार उलथवले आहेत तरी देखील शासन वठणीवर आले नसून कुठलेही धोरण ठरवलेले नाही. शेतकऱ्यांची चेष्टा अद्यापही सुरूच आहे. आज व्यापाऱ्यांनी हद्दच पार केली असून 5 पैसे किलोने कांदा गोलटीला भाव मिळाला आहे. या मुळे संतप्त शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

लासलगाव बाजार समितीत हा धक्कादायक प्रकार घडला असून शेतकऱ्यांची अवहेलना कधी थांबणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने याबाबत माहिती मागवली असून पुढील कारवाई साठी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.

देशात शेतकरी देशोधडीला लागत असताना केंद्रिय राज्यमंत्री डॉ भारती पवार कुठे हरवल्यात हा प्रश्न संतप्त शेतकरी उपस्थित करत आहेत. नेहमीच शेतकऱ्यांना दिलासा देत कागदी घोडे नाचवण्याचे काम डॉ पवार यांनी केले असून मी शेतकऱ्यांची कैवारी असल्याचे नेहमीच भासवले, कांदा लागवड सुरू असताना वाणिज्य मंत्र्यांना भेटून नेमक पवारांनी काय केले हा संशोधनाचा भाग आहे, शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम डॉ पवारांनी केले का असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

यावर्षी लागवड तसेच काढणीसाठी अफाट खर्च आलेला असताना केंद्राने बोटचेपे धोरण घेत शेतकऱ्याना देशोधडीला लावले आहे. वेळीच शेतकऱ्याना दिलासा द्यावा अन्यथा शेतकरी उद्रेक करेल व तो कोणाला परवडणारा नसेल इतकंच…


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here