ठाणे जिल्ह्यातील मुरबाड भागात सचिन स्टोन क्रशर या खडी केंद्रासाठी 5.93 कोटींची वीजचोरी केल्याप्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा शुक्रवारी दाखल करण्यात आला आहे. वीजचोरी झाल्याचे महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणले.
भरारी पथकाने फालेगाव येथील सचिन स्टोन क्रशरच्या (सर्व्हे क्रमांक १४९/१४) मीटरची ५ मे रोजी तपासणी केली. मीटर रीडिंगमध्ये छेडछाड करणार्या गॅझेटचा सहाय्याने करून वीज चोरी करून गेल्या 29 महिन्यांत एकूण 34,09,901 युनिट्सचा वापर केल्याचे समोर आले आहे. या विजेची किंमत 5.93 कोटी इतकी असल्याचा अंदाज आहे, असल्याचे अधीकाऱ्यांनी सांगितले.
गॅझेटचा मीटर ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. यात मीटरमध्ये काळ्या रंगाची चिकटपट्टी गुंडाळून रिमोट कंट्रोल सर्किट बसवण्यात आल्याचे आढळले. रिमोट कंट्रोलच्या मदतीने हे सर्किट नियंत्रित करून क्रशरच्या प्रत्यक्ष वीज वापरून देखील मीटरमध्ये कमी नोंद , अशी व्यवस्था केल्याचे तांत्रिक विश्लेषणातून निष्पन्न झाले. डिसेंबर २०१९ ते एप्रिल २०२२ दरम्यान वीजचोरीचा हा प्रकार सुरू होता.
वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे. चंद्रकांत भांबरे आणि त्यांचा मुलगा सचिन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मुरबाड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम