नगर जिल्ह्यात कांदा उत्पादनात मागील पाच वर्षांत दुप्पटीने वाढ झाली. कृषी खात्याच्या लेखी कांद्याचे सरासरी क्षेत्र ९६ हजार १५२ हेक्टर होत तरी पाच वर्षांपूर्वी १ लाख २५ हजार ३८९ वर पोहचले होते.परंतु आता कांदा उत्पादन सन २०२१-२२ मध्ये २ लाख १९ हजार ४५२ हेक्टरवर पोहचले आहे.
महाराष्ट्रात नाशिक खालोखाल नगरमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जाते. नगर येथे कांद्याचे क्षेत्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता नगर जिल्ह्यात सुमारे दीड लाख कांदा उत्पादक शेतकरी आहेत. खरीप, लेटखरीप व रब्बी-उन्हाळी अशा तिन्ही हंगामात कांदा पिकाचे उत्पन्न घेतले जाते. शेतकरी साठवणीसाठी कांद्याचे लागवडीपासूनच मोठं नियोजन करतात. एकावेळी २५ ते ३० टनाहून अधिक कांदाचे उत्पादन काढले जाते.
ज्वारी व हरभर्याच्या तुलनेत कमी खर्चात कांद्या अधिक पैसा मिळू लागला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादन घेतात. केवळ बीड, नगर, परभणी येथे कांद्याचे क्षेत्र वाढले आहे असे नव्हे तर बागायती क्षेत्रातही कांदा लागवड दिवसेंदिवस वाढू लागली आहे. कांदा पीक नाजूक मानले जाते त्यामुळे त्याच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष द्यावे लागते.
सध्या नगर बाजार समितीत चांगल्या कांद्याला प्रतीकिलो १० ते ११ रुपये भाव मिळतो आहे. रब्बी-उन्हाळी कांद्याचे क्षेत्र ६० टक्के तर खरीप आणि खरीपातील उशिराचे क्षेत्र प्रत्येकी २० टक्के आहे. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्यावर्षी ३८ ते ४० लाख क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर यंदा कांद्याची आवक ३३ ते ३५ लाख क्विंटल झाली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम