कृषी प्रतिनिधी : कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे. जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांच्या मनात अन्यायाची भावना सर्वत्र बघायला मिळत होती. मात्र राज्य सरकार अशा कर्जदारांच्या खात्यात लवकरच प्रत्येकी 50 हजार सानुग्रह अनुदान जमा करणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.
राज्य सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाची घोषणा केली, त्या घोषनेनुसार लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार जमा होणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. थकीत कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले मात्र जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्जफेड करतायत त्यांच्यासाठी दिलासा देण्याचे काम आघाडी सरकारने केले आहे. तसेच धान उत्पादन शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अर्धी रक्कम जमा झालेली आहे. लवकरच उर्वरित रक्कम जमा होईल, असे पटोले यांनी सांगितले.
2008-9 साला पासून थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे . त्यांचे काय होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकाला न्याय देऊ असा विश्वास दिला मात्र, अद्याप या थकबाकीदार शेतकऱ्यावर निर्णय झालेला नसल्याने , त्यांच्या डोक्यावरील ओझे तसेच आहे. या शेतकऱ्यांकडे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम