शेतावर इंटरनेट नाही मग ‘ई पीक पाहणी’ ॲप मध्ये पीकपेरा असा नोंदवा

1
93

सोमनाथ जगताप
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : शेतकरी यांना त्यांचा ई पीक पाहणी ॲप मधील नोंदणी साठी व पीक पाहणी अपलोड करण्यासाठी फक्त इन्टरनेट सुविधा आवश्यक आहे नोंदणी साठी सांकेतांक क्रमांक स्वताकडे लिहून / लक्षात ठेवावा.

• चार अंकी सांकेतांक क्रमांक नमूद करुन मोबाईल ॲप मध्ये लॉगीन करून शेतात जाऊन पीक पेराची माहिती भरावी.
• शेतातील उभ्या पिकांची माहिती भरुन झाल्यानंतर पीकांचा फोटो काढावा व तो सबमिट करावा.
• अशा वेळी इंटरनेट किंवा अक्षांश रेखांश बाबत मेसेज आल्यास तेथूनच एकदा data बंद करून पुन्हा सुरु करावा किंवा GPS / लोकेशन बंद करून पुन्हा सुरु करावे .मग अडचण येणार नाही.
• मोबाईल इंटरनेट क्षेत्रात आल्यानंतर ॲप मधील अपलोड टॅब चा वापर करुन पीक पेरा अपलोड करावा.

अतिमहत्वाचे : ई – पीक पाहणी संदर्भात आवश्यक सुचना

● सन २०२१-२०२२ या महसुली वर्षांपासून ७/१२ वर पिकाची नोंदणी फक्त मोबाईल मध्ये ई पीक पाहणी अँप च्या माध्यमातूनच होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने स्वतः आपल्या मोबाईल मध्ये ई पीक पाहणी अँप install करून प्रत्यक्ष आपल्या शेतात जाऊन आपल्या शेतातील पिकाची माहिती या अँप मध्ये योग्यरीत्या अचूकपणे भरून पिकाचा फोटो काढून भरावयाची आहेत. यानंतर तलाठी कार्यालयामार्फत आपल्या शेतातील पीक पेऱ्याची माहिती भरली जाणार नाहीत याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाची माहिती स्वतः भरणे आवश्यक आहेत.
● एका रजिस्टर मोबाईल मध्ये जास्तीत जास्त २० शेतकऱ्यांची पीक पाहणी नोंदविता येईल.
● तुमच्या मोबाईल वर आलेला ४ अंकी OTP हा तुमचा कायमस्वरूपी पासवर्ड राहील, त्यामुळे परत तुम्हाला पीक नोंदणी करताना हा पासवर्ड आवश्यक राहील याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.
● ई पीक पाहणी अँप मध्ये पीक नोंदणी ही मर्यादित वेळेतच म्हणजे १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीतच करायची आहेत, या कालावधी नंतर पीक पाहणी नोंद होणार नाही, कारण त्यानंतर रब्बी हंगामातील पिकांची ई पीक पाहणी सुरू होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या कालावधीतच आपल्या पिकाची नोंद ई पीक पाहणी अँप च्या माध्यमातून करून घ्यावी.
● पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणण्याची सुवर्ण संधी :
सातबारा उताऱ्यावर पोटखराब क्षेत्र – अ हा प्रकार असेल आणि आपण ते क्षेत्र जमीन नांगरून किंवा सपाटीकरण करून लागवडीसाठी खाली आणलं असल्यास ते क्षेत्र *लागवड योग्य पड* क्षेत्रात नोंदणी केल्यास, त्या क्षेत्रावर देखील बँकेकडून पीक कर्ज मिळणार आहे. त्या क्षेत्रामध्ये नैसर्गिक आपत्ती मुळे झालेली नुकसानभरपाई मिळणार आहे. त्या क्षेत्रासाठी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेता येईल. त्या क्षेत्राचा देखील पीक विमा अर्ज भरताना समावेश करता येणार आहे.
● एकदा पीक पाहणी नोंद केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही, त्यामुळे आपल्या पिकाची नोंद अचूकपणे करावी.

पीक पाहणी नोंद न केल्याने होणारे नुकसान
१) आपले शेत पडीत दाखविले जाईल किंवा पेरणी झालीच नाही असे दाखवले जाईल.
२) पुढील हंगाम करिता कोणत्याही बँकांकडून पीक कर्ज घेताना अडचणी निर्माण होईल.
३) प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळणार नाही.
४) जर शासनाद्वारे एखाद्या पिकाला आर्थिक मदत जाहीर झाली तर आपण आपली पीक नोंदणी न केल्याने शासनाद्वारे मिळणारी मदत आपल्याला मिळणार नाही.
५) जर तुमच्या शेतातील पिकांचे जंगली जनावरांमार्फत नुकसान झाले तर आपण पीक नोंदणी न केल्याने आपल्याला कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळणार नाही.अश्या प्रकारे आपण पी पाहणी नोंदणी न केल्याने वरील प्रकारचे नुकसान होईल, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या शेतात जाऊन ई पीक पाहणी अँप द्वारे आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी .

ई पीक पाहणी अँप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/details?id=org.mahait.epeek

भाग 1 – ई पीक पाहणी अँप कसे चालवावे याची लिंक

भाग – 2 ई पीक पाहणी अँप चालवताना येणाऱ्या अडचणी व निराकरण व इतर महत्वपूर्ण माहिती लिंक

भाग – 3 ई पीक पाहणी अँपवर पड क्षेत्र व मिश्र पिकांची माहिती कशी भरावी याची लिंक.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here