उमराने कृषी उत्पन्न बाजार समितीत अडकलेल्या शेतकऱ्यांचे पैसे मिळणार

0
64
जाहीर नोटीस

देवळा प्रतिनिधी : उमराने कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी दादाजी देवरे, अनिल देवरे योगिता देवरे यांनी कांदे खरेदी केली मात्र शेतकऱ्यांचे अद्याप पैसे दिलेले नव्हते. बाजार समितीचे जाहिरात दिलेली असून ज्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. त्यांना बाजार समितीने पुराव्यानिशी बाजार समितीशी संपर्क करायला लावला आहे.

व्यापाऱ्यांनी थकवलेल्या पैशा संदर्भात प्रहार संघटनेने अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाची तारांबळ उडवली होती. यानंतर झोपेतून जाग्या झालेला प्रशासनाला उशिरा का असेना मात्र शहाणपण सुचले आहे. शेतकऱ्यांना मोबदला लवकरच मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. नेहमीच आंदोलनाचे हत्यार का उचलावे लागते यासह अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत.

फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना जाहिरात प्रसिद्धीच्या झालेल्या शेतकऱ्यांना जाहिरात प्रसिद्धीच्या पाच दिवसापर्यंत मुदत देण्यात आली आहे. पुराव्यानिशी शेतकऱ्यांनी बाजार समितीत जावे, तसेच नंतर आलेल्या शेतकऱ्यांची तक्रार ग्राह्य धरणार नसल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here