Nashik News | नाशिक जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या देवळा पाणीपुरवठा योजनेवरील सात रोजंदारी कर्मचाऱ्यांना रूपांतरित नियमित अस्थायी आस्थापनेवर घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता या सर्व कर्मचाऱ्यांना विविध लाभ मिळणार आहेत.
या योजनेवरील सात कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याबाबतची मागणी मंजूर होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समोर वेळोवेळी धरणे आणि उपोषणे करून, विधानसभा तारांकित प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आले होते. तसेच, याबद्दल न्यायालयातही दाद मागण्यात आली होती.
Rain Update | शेतकऱ्यांसमोर संकट; राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाची शक्यता
या योजनेवरील सात रोजंदारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीच्या पाच वर्षांनंतर नियमित आस्थापनेवर घेण्यात यावे, या शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आदेश काढले आहेत.
कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घेण्याकरिता नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशनचे रवींद्र थेटे २० वर्षांपासून न्यायालयात लढा देत होते. आस्थापनेवर घेतल्यानंतर थेटे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांची भेट घेत त्यांचे आभार मानले आहे.
Nashik Citylinc | नाशिकची जीवनवाहिनी पुन्हा बंद..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम