द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; कृषि विज्ञान केंद्र मालेगाव व कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर , पुणे ,कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने देवळा येथे उद्या शुक्रवारी( दि २९) रोजी सकाळी ९ वाजता शेतकरी उत्पादक कंपन्यांकरिता ” शास्त्रीय कांदा लागवड चर्चासत्र ” आयोजित करण्यात आले आहे .
देवळा येथील डॉ . दौलतराव आहेर वाचनालय व अभ्यासिका , ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे , मालेगाव रोड , या ठिकाणी आयोजि चर्चा सत्र कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ . मेजर सिंग संचालक , कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय , राजगुरुनगर , तर अध्यक्षस्थानी डॉ लाखन सिंग ,संचालक ,कृषी तंत्रज्ञान उपयोजना ,पुणे , केदा नाना आहेर सभापती , कृषि उत्पन्न बाजार समिती , अध्यक्ष , देवळा अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी , राजेंद्र निकम, प्रकल्प संचालक , तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ) , नाशिक ,विवेक सोनवणे ,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नाशिक हे उपस्थित राहणार आहेत . याप्रसंगी प्रमुख वक्ते प्रा श्रीधर देसले , सहाय्यक प्राध्यापक ( उद्यानविद्या ) कृषि महाविद्यालय , धुळे , डॉ . विजय महाजन ,प्रमुख शास्त्रज्ञ ( उद्यानविद्या ) कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय , राजगुरुनगर , पुणे ,विशाल चौधरी विषय विशेषज्ञ ( पीक संरक्षण ) , कृषि विज्ञान केंद्र , मालेगाव हे कांदा बीजोत्पादन, शास्त्रीय कांदा लागवड तंत्रज्ञान, कांदा पिकातील मुख्य किडी ,रोग आणि त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत . या चर्चासत्रास देवळा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे विशेष सहकार्य लाभले असून, यावेळी उपस्थित राहावे ,असे आवाहन आयोजकांनी केले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम