11 वर्षीय मुलगी झाली प्रेग्नन्ट ; 25 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याचे आले समोर

0
11

द पॉईंट नाऊ ब्युरो : पुणे शहरात 11 वर्षीय मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. आणि त्यामुळे ही मुलगी प्रेग्नन्ट राहिल्याचे समोर आहे. पुण्याच्या लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत हा प्रकार घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला डॉक्टरकडे नेण्यात आले होते. त्यात तिची तपासणी केली असता, ती चार महिन्यांची प्रेग्नन्ट असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

या सर्व प्रकारातील आरोपी 25 वर्षांचा असून त्याचे नाव सोनू उर्फ सिद्राम भालेराव आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करणाऱ्या महिलेच्या पतीसोबत हा आरोपी कामास होता.

या आरोपीने पीडितेवर बलात्कार करून, तिला कोणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिली होती. या कारणास्तव ही बाब अद्यापपर्यंत लक्षात आलेली नव्हती. मात्र पीडित मुलगी प्रेग्नन्ट राहिल्याने हा सर्व प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here