२७ वर्षानंतर भरली शाळा…११ वी-१२ वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

0
10

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : देवळा येथील ११ वी व १२ वीच्या सन १९९२-९४ मधील बॅचच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दिवाळीच्या सुटीत मोठया उत्साहात साजरा झाला. तब्बल २७ वर्षानंतर मित्र व शिक्षक एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

देवळा येथील सन १९९२ ९४ मधील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याप्रसंगी उपस्थित शिक्षक व माजी विद्यार्थी छाया सोमनाथ जगताप

व्यवसाय, नोकरी, कामानिमित्त दुरावलेले मित्र यानिमित्त एकत्र आले. मैत्रीच्या खऱ्या खुऱ्या भावनांना पुनर्जीवित केले. पुन्हा एकदा शाळेतील मित्रांच्या भेटीमुळे उत्साहवर्धक ऊर्जा प्राप्त झाली. यावेळी उपस्थित पी.के.चंदन, पी.बी.देवरे, एम.डी.खैरणार, व्ही.पी.केदारे या गुरुजनांचा सर्वच विद्यार्थ्यांनी सन्मान करत भेटवस्तू दिल्या. आणि तद्नंतर

या माजी विद्यार्थ्यांनी व गुरुजनांनी मनोगते व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.एकमेकांच्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू असा संदेश दिला.

कोरोना काळात माजी सैनिक जिभाऊ खैरणार यांनी यातील एका मित्राला मुंबईहुन रेमडिसिव्हर इंजेक्शन पोहोच केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

सटाणा येथील कवी सोमदत्त मुंजवाडकर यांनी चारोळ्या, कविता सादर करत रंगत आणली. या स्नेहमेळाव्याचे संयोजन प्रशांत पवार, जिभाऊ खैरणार, दादाजी देवरे, किशोर पाटील, अण्णा पवार, शरद गांगुर्डे, उमेश ठाकरे, भाऊसाहेब महाजन, नंदू पवार, पोपट आहिरे, दीपक सोनवणे, रोशन अलीटकर, माणिक बागुल, हेमंत आहेर, दादाजी भामरे यांनी केले. सुत्रसंचालन दादाजी देवरे यांनी केले आभार प्रशांत पवार यांनीमानले .

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here