नाशिक प्रतिनिधी : सहकार क्षेत्रातील निवडणूक सध्या पुढे ढकलल्या आहेत. जिल्ह्यातील 14 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून या निवडणुकांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे गुडघ्याला बाशिंग लावून असलेल्या उमेदवारांचा मोठा हिरमोड झाला आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीआधी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तथापि, जिल्ह्यातील बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलला आहे.
मुदतवाढ पुढील तीन महिन्यांची असून आता बाजार समितीवरील संचालकांना 23 एप्रिल 2022 पर्यंत कामकाज बघता येणार आहे. दरम्यान, याकाळात मात्र, या संचालक मंडळाला धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही, असे आदेश सहकार आणि पणन मंत्रालयाने काढले आहेत. यामुळे काहीअंशी नामधारी अधिकार या संचालकांना असणार आहेत.
सहकारी सोसायट्यांच्या (Sahkari Society elections) निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने एका निकालाच्या दरम्यान दिलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम सहकारी निवडणूक प्राधिकरणाने रद्द केल्याचे समजते.
जिल्ह्यातील ह्या बाजार समितींना मुदत वाढ मिळाली. नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, नांदगाव, मनमाड, येवला, चांदवड, देवळा, उमराणे, घोटी, कळवण, दिंडोरी, सिन्नर, मालेगाव व सुरगाणा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम