नंदूरबार : देशभरात प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा येथे यंदा केवळ अश्व बाजाराला परवानगी मिळाली आहे. पुष्करच्या मेळाव्यानंतर घोडे बाजारासाठी क्रमांक दोनचा बाजार असलेल्या सांरगखेडा घोडेबाजाराला 18 तारखेपासून सुरुवात झाली आहे. खरेदी-विक्रीसाठी जवळपास 1 हजार 361 घोडे दाखल झाले आहे. तर गेल्या पाच दिवसांत 404 घोड्यांची विक्री झाली आहे.
गेल्या पाच दिवसात सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 404 घोड्यांची विक्री झाली आहे. यातून 1 कोटी 53 लाख 65 हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. नाताळच्या सुट्टीत निमित्ताने सारंगखेडा येथील घोडे बाजारात आजपासून पुढील तीन दिवस अश्व सौंदर्य स्पर्धा रंगली आहे. देशभरातून विविध जातीवंत घोडे खरेदी-विक्रीसाठी या घोडेबाजारात दाखल झाले असून आणि या घोड्यांची किंमत कोटींमध्ये आहे. हा घोडेबाजार 28 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.
चारशे वर्षे जुना सारंगखेडा यात्रोत्सव..
सारंगखेडा येथील सुमारे चारशे वर्षे जुना असलेला सारंगखेडा यात्रोत्सवाला दोन वर्षांपासून खंड पडला होता. शासनाने दत्त दर्शनासाठी त्याचबरोबर घोडे बाजारासाठी सर्व नियम पाळत परवानगी दिली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम