सन्माननीय महोदय साहेब ,
साष्टांग नमस्कार पत्रास कारण की कृषिप्रधान देशात जगाचा पोशिंदा शेतकऱ्याची चालवलेली दशा व दिशा अतिशय भयानक स्वरूपाची आहे. आज संपूर्ण नाशिक जिल्ह्यात टमाटा, कोबी, फ्लॉवर, वांगी कोथिंबीर रात्रंदिवस कष्ट करून पिकवली व आज मात्र अक्षरशः स्त्यावर फेकण्याची वेळ माझ्या मायबाप शेतकऱ्यावर आली आहे.
साहेब सर्वांना तुपाशी शेतकऱ्याला उपाशी हीच का तुमची राजनीति, साहेब असं करू नका दोन वर्षाचा कोरोणा काळात सर्व जग ठप्प असतांना रात्रंदिवस कष्ट करून भारताची अर्थव्यवस्था सुधारली. आम्ही काय पाप केलं ते तर सांगा ना बाकीच्या सर्व व्यापारी मालाला योग्य भाव मग आम्हाला का नको फक्त सर्वीकडे शेतकऱ्याची लूटच लुट सुरू आहे.
आम्ही ठरवलं तर सहा महिन्यात सर्व काही बरोबर होईल पण आम्ही प्रेमाने वागतो हीच आमची चूक तुमच्या दोघांच्या भांडणात आमचा तोटाच होत आहे. साहेब तुम्हीच सांगा जगायचं कसं कमीत कमी शेतकरी राजाचा समोर आलेल्या पोळा सणाची तरी कदर राहू द्या ऐन दिवाळीत आमचं पोरगं डोक्यावर मेथीची भाजीची टोपली घेऊन तुमच्या दारात येतं ते तुमचा लक्ष्मीपूजन करण्यासाठी आणि त्याला विचारलं जातं काय रे कशी दिली जुडी आणि तो आदराने सांगतो दादा दहा रुपयाला एक आणि श्रीमंत लोक म्हणतात दहाला दोन दे तो सांगतो दादा दिवाळीत घरी मुरमुरे न्यायचे आहेत दहाला परवडत नाही मग राहू दे तुला, घरी घेऊन जाय मग सांगा ना साहेब कसं जगायचं बस झाली आता ही क्रूर चेष्टा .
तुम्हाला देतायेत असेल तर बघा नाहीतर चालते व्हा प्रत्येक विलक्षण ला स्वामीनाथन आयोग लागू करणार लागू करणार तो कधी लागू करणार ते तरी तुम्ही आम्हाला समजून सांगा हे ऐकून आमच्या तीन पिढ्या संपल्या आतातरी लागू करा, साहेब बस झाले आता तुमचं राजकारण आता राहिलेला काळ शेतकऱ्यांसाठी द्या ना साहेब मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा एवढंच आमच्या वाटेला का ?
अरे कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय आपण राहत नाही उठ कुणब्याच्या पोरा लढायला शिक नाहीतर हे असंच चालेल आणि चालत राहील टीप हे पत्र मी माझ्या विवेकबुद्धील शाबूत ठेवून लिहिले आहे कुठल्याही राजकारणी किंवा पक्षाच्या कुबड्या घेऊन लिहिलेलं किंवा ऐकलं नाही प्लीज काही चुकले असेल तर मोठ्या दिलाने माफ करा माफ करा , लक्षात ठेवा लक्षात ठेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात शेतकऱ्या शिवाय अन्न शिजणार नाही.
आपलाच एक तरुण शेतकरी
कैलास हंसराज सोनवणे
मु.वार्शी ता.देवळा नाशिक
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम