द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : सोनशेलू समर्थ कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूताने सोनशेलू येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत, बीज प्रक्रियाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक दाखविले.
१० किलो बियाण्यासाठी २५० ग्रॅम रायझोबियमचा वापर करावा. बियाणे हाताने हळूवार चोळावे. बीज प्रक्रियेनंतर बियाण्याला अर्धा तास सावलीत वाळवून घ्यावे आणि लगेच पेरणी करून घ्यावी. बीज प्रक्रिया केल्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते आणि त्यामुळे खर्चात बचत होते.
रायझोबियमचा वापर डाळीवर्गीय पिके जसे तूर, मुग, मठ, चवळी,उळीद, सोयाबीन इ. साठी केला जातो.
कृषिदूत भूषण कोतवाल याने हे प्रात्यक्षिक केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे, रावे समन्वयक प्राध्यापक मोहजीतसिंग राजपूत, पॅथाॅलोजी विभाग प्रमुख प्राध्यापक शूभम काकड यांचे मार्गदर्शन लाभले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम