‘कि व्हिजन ऍग्रो मॉल’मुळे शेतकऱ्यांची वेळेसह पैशांची बचत : आ. डॉ. आहेर

0
17
देवळा येथे की व्हिजनच्या वर्धापनदिन दिनानिमित्त उपस्थित आमदार डॉ .राहुल आहेर यांचा सत्कार करताना अध्यक्ष भाऊसाहेब पगार, सम्राट वाघ ,राजीव पगार ,मधुकर वाघ आदी .

द पॉईंट नाऊ ; मोठ्या शहरांप्रमाणेच ग्रामीण भागात देखील मॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती पिकांसाठी व घरगुती वापरासाठी लागणाऱ्या वस्तू एका छताखाली मिळत असल्याने वेळीची व पैशांची बचत होत असल्याने याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन आमदार डॉ . राहुल आहेर यांनी आज येथे केले.

देवळा येथे की व्हिजनच्या वर्धापनदिन दिनानिमित्त उपस्थित आमदार डॉ राहुल आहेर यांचा सत्कार करताना अध्यक्ष भाऊसाहेब पगार सम्राट वाघ राजीव पगार मधुकर वाघ सोमनाथ जगताप आदी

देवळा येथील ‘की व्हिजन’ ऍग्रो मॉलचा( दि २०) रोजी प्रथम वर्धापनदिन साजरा करण्यात आला . यावेळी ते बोलत होते . वर्धापनदिन दिनानिमित्त सत्यनारायण महापुजा आयोजित करण्यात आली होती. तसेच शेतकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले .

कार्यक्रमाला योगेश आहेर, ,योगेश आहेर, कौतिक पगार, धनंजय पवार, रवींद्र देवरे, अतुल पवार, लक्ष्मीकांत आहेर, संभाजी आहेर, प्रवीण मेधने , बाळासाहेब गुंजाळ ,धर्मा देवरे, राजेंद्र देवरे ,बापू देवरे, कृष्णा जाधव ,फुला जाधव, भाऊसाहेब मोरे, शशिकांत पवार, मधुकर वाघ ,दीपक देवरे , घनश्याम पवार, अमोल आहेर, अनिल आहेर, नदीश थोरात नंदू निकम ,महेंद्र आहेर ,शामकांत पवार , सतीश गुंजळ, डॉ प्रशांत निकम, डॉ अविनाश आहेर , दीपक निकम , नानू आहेर ,बंडू आहेर, उमेश भामरे , किशोर आहेर आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या .

स्वागत मॉलचे अध्यक्ष भाऊसाहेब पगार यांनी मानले. आभार जितेंद्र आहेर यांनी मानले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी सम्राट वाघ, राजीव पगार, जयेश शिंदे , दिनेश पगार, राहुल आहेर,योगेश शिरसाठ, जनार्दन आहेर ,वैभव आहेर आदींनी परिश्रम घेतले .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here