शेतकऱ्यांच्या मागणीला किंमत देणार नसाल तर नाफेडची कांदा खरेदी उधळणार – भारत दिघोळे

0
72

कृषी प्रतिनिधी : शेतकऱ्यांना गृहीत धरून कांदा खरेदी होत असेल तर हा मनसुबा उधळून लावू असा इशारा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिला आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानांनी सांगितले होते की वर्ष 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू तर मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की शेतकऱ्यांचा 7-12 उतारा कोरा करू परंतु शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि 7-12 कोरा करणे तर दूरच उलट शेतीसाठी लागणाऱ्या सर्वच कृषी निविष्ठांच्या किंमती वाढल्या आहेत तर 7-12 कोरा होण्याऐवजी शेतकऱ्यांवर कर्जाचे बोजे वाढत चालले आहे.

गेल्या 2 महिन्यांपासून शेतकऱ्यांचा कांदा उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात म्हणजे 8-9 रुपये किलोने विकला जात आहे परंतु कांद्याचे भाव वाढले पाहिजे यासाठी ना राज्य सरकारचे लक्ष आहे ना केंद्र सरकारचे लक्ष आहे शेतकरी मात्र आपापल्या परीने आर्थिक संकटाला तोंड देत आहे.

सरकारकडून नाफेडच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांचा खरेदी केलेल्या कांद्याला काल 16 एप्रिल रोजी लासलगाव बाजार समितीत काही मोजक्याच वाहनांमधील कांद्याला सरासरी 11 रूपये दर मिळाला आहे या दरात उत्पादन खर्चही भरून निघणार नाही बाजार समितीसोबतच लवकरच फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या अंतर्गत नाफेडकडून खरेदी करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या कांद्याला जोपर्यंत 30 रुपये प्रति किलो दर मिळत नाही तोपर्यंत नाफेडची कांदा खरेदी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून बंद पाडण्यात येईल असा इशारा संटनेने अध्यक्ष दिघोळे यांनी दिला आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here