शेतकऱ्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रूच? नाशकात कांदा पिकाचे भाव आले खूपच खाली

0
18

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिक मध्ये शेतकरी वर्गाला कांद्याचे भाव खूपच खाली आल्याने मोठा फटका बसत आहे. सोमवारी लासलगाव बाजार समितीत लाल कांदा 600 ते 900 रुपये, तर उन्हाळी कांदा 900 ते 1200 रुपयांपर्यंत विकला गेला.

मागील दोन वर्षात कोरोनाने शेतकरी वर्गाचे मोठे हाल केले आहेत. डोक्यावर कर्ज घेऊन पिकवलेलं पीक शेतकऱ्याला काहीही देऊ शकलं नाही. त्यात अवकाळी पावसाने देखील शेतकऱ्याचा मोठा घात केला आहे. अवकाळी पावसामुळे भिजलेल्या कांद्याला अवघा 200 ते 400 रुपये भाव मिळाला आहे.

शेतकऱ्यांना आपला ऐन हाता-तोंडाशी आलेला घास एक प्रकारे हिरावल्यासारखे झाले आहे. यावेळी शेतकरी वर्गाला कांदा पिकाकडून मोठी अपेक्षा होती. मात्र कांद्याच्या उतरलेल्या भावांनी शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

शेतकरी वर्गाने मोठ्या उमेदीने कांद्याचे उत्पादन घेतले. मात्र अवकाळी पावसाने सारा कांदा भिजला. ज्यामुळे कांद्याच्या भावांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here