शेतकऱ्यांसाठी मोठी माहिती ! चाकण मार्केटात कांद्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यात

0
15

पुणे जिल्हा हे कांदा उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर आहे. पुणे येथील चाकण मार्केट मधील कांद्याचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. बुधवारी खेड कृषीउत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील उपबाजरात कांद्याची आवक घटली. कांद्याची केवळ 2 हजार 500 क्विंटल आवक झाली. याचा मोठा फायदा कांदे शेतकऱ्याला झाला आहे. कांदा मार्केट मध्ये उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाली आहे

यंदाच्या कांद्याच्या हंगामात खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण बाजारपेठेत कांद्याची सुरुवातला भरघोस आवक झाली ; मात्र दर घसरल्याने आवक घटली.अवाक घटल्याने कांद्याला 600 ते 1 हजार रुपये एवढा कमाल बाजार भाव मिळाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली. शेतकऱ्यांना वाहतुकीची खर्च, मोलमजुरी, लागवड खर्च पेक्षा कमी दर मिळत असल्याने कांदा विक्री करण्याएवजी साठवणूक करण्यावर भर दिला. कांदा विकून शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन खर्च सुद्धा शिल्लक राहत नाही.

अजूनही काही काही शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर कांदा शिल्लक आहे. चांगला बाजार भाव मिळला तर कांदा मार्केट मध्ये आणण्यास शेतकरी तयार होतील .या वर्षीच्या कांद्याचा हंगाम उरकत आला ; तरी कांद्याच्या दरात मात्र अद्याप फारशी सुधारणा होऊ शकली नाही. एखादा पाऊस झाल्यानंतर मार्केट मध्ये कांद्याची मोठी आवक होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here