द पॉईंट नाऊ न्यूज ब्युरो : सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवित असते. प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना ही केंद्रसरकारची शेतकऱ्यांसाठीची महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा लाभ देशातील बहुतांश शेतकरी घेत आहेत.
पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून तीन हप्त्यांमध्ये सर्व शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्षी 6,000 रुपयांचे उत्पन्न समर्थन दिले जाते असून या योजनेच्या ११ व्या हप्त्याची तारीख नुकतीच जाहीर झाली आहे. एप्रिल ते जुलै महिन्यांसाठीचा हा हप्ता असणार आहे. याच्या तारखेबाबतही लवकरच शेतकऱ्यांना माहिती दिली जाणार आहे.
पीएम किसान योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी ११ व्या हप्त्यासाठी काही कागदपत्रे अपडेट करणे आवश्यक आहे. जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी पीएम किसान खात्याशी आधार लिंक करणे आवश्यक आहे. याशिवाय ईकेवायसी देखील अनिवार्य आहे.
* करा ई-केवायसी अपडेट खाली दिलेल्या महिनुसार करा
१) यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
२) पेजच्या उजव्या बाजूला उपलब्ध असलेल्या eKYC पर्यायावर क्लिक करा.
३) आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि शोध वर क्लिक करा.
४) आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
५) ‘Get OTP’ वर क्लिक करा आणि तुमचा OTP इथे टाका.
अधिक माहितीसाठी संपर्क करा
• पीएम किसान सन्मान योजनेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा यासंदर्भात कोणतीही तक्रार करण्यासाठी खालील ठिकाणी संपर्क साधा.
• पीएम किसान टोल फ्री नंबर : 18001155266
• पीएम किसान हेल्पलाइन नंबर : 155261
• पीएम किसान लैंडलाइन नंबर : 011—23381092, 23382401
• पीएम किसानची नवीन हेल्पलाइन : 011-24300606
• पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन : 0120-6025109
. ई-मेल आईडी: pmkisan-ict@gov.in
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम