जळगाव प्रतिनिधी : कमीतकमी काळात व कमी खर्चात टोमॅटोचे फायदेशीर पीक म्हणून टोमॅटोकडे वळावे. बाजारपेठेत ग्राहकांची मागणीचा अभ्यास करून जैन इरिगेशनसारख्या उच्च कृषितंत्रज्ञानाचा अवलंब करणे आता काळाची गरज ठरली आहे. असे विचार कागोमे कंपनीचे भारतातील प्रमुख मीलन चौधरी यांनी शिरसोली येथील टोमॅटो कांदा पीक परिसंवाद केले.
जैन इरिगेशन सिस्टीम, जापान स्थित कागोमे फूडस् इंडिया यांच्या संयुक्तविद्यमाने शिरसोली येथील शेतकरी सुरेश अस्वार यांच्या शेतात ‘टोमॅटो-कांदा करार शेती व पीक परिसंवाद’ आयोजला होता. पूर्व मशागत, पांढरा कांदा, मिरची, टोमॅटो रोपांची लागवड पाणी व्यवस्थापन, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, फर्टिगेशन, कीड-रोग व्यवस्थापन याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर डॉ अनिल ढाके, गौतम देसर्डा, जिल्हा कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, तालुका कृषी अधिकारी श्रीकांत झाम्बरे, कृषी पर्यवेक्षक शरद पाटील, जैन इरिगेशनचे विभागीय व्यवस्थापक डी. एम. बऱ्हाटे, पांढरा कांदा करार शेतीत सहभागी शेतकरी सुरेश अस्वार, श्रीराम पाटील, श्री गजानन ठिबकचे संचालक पी. के. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
जैन इरिगेशन व कोगोमे दोन्ही कंपन्यांनी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्य सुरू केले आहे ही चांगली बाब असल्याचे सांगून कोगोमे कंपनीबाबत माहितीत सांगितले की, ही 126 वर्षे जुनी जापानची कंपनी असून जगभरात कंपनीचे कार्य सुरू आहे. भारतात 2007 पासून ही कंपनी काम करत असून 2011 पर्यंत संपूर्ण भारतभरातून 32 हजार मातीचे नमुने ऑस्ट्रेलीयाला पाठविले व ज्या जमिनीत टोमॅटो भरघोस उत्पादीत होऊ शकतील अशा ठिकाणी जैन इरिगेशन व कोगोमे कंपनी मिळून टॉमॅटो लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भविष्यात येथील मातीवर येणाऱ्या टोमॅटो पिकावर खूप मोठे कार्य होणार आहे. शेतकऱ्यांना टोमॅटोच्या उत्पादनातून करार शेतीच्या माध्यमातून हमी भाव दिले जातील याबाबत उपस्थितांना मीलन चौधरी यांनी माहिती दिली.
पिकांची अवस्था, जमिनीच्या पोत आणि आवश्यकता नुसार पाणी व खतांचे काटेकोरपणे नियोजन आवश्यक आहे. मल्चींग खाली ठिबक सिंचन अवलंबणे कठीण असते. ड्रीपर तासाला किती लीटर पाणी देणारा असेल, जमिन कशी, पीक कोणते या सगळ्या गोष्टींचा बारकाव्याने विचार करणे त्यापद्धतीने नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. टोमॅटो अथवा भाजीपाला पिके अत्यंत संवेदनशील असतात ठिबक सिंचन व मल्चिंग यांचा सुयोग्य वापर करावा असे आवाहन करून ठिबक व मल्चिंगसाठी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाबाबत डी. एम. बऱ्हाटे यांनी मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांनी कांद्यासोबतच टोमॅटो व मिरची या पिकाची देखील लागवड करावी. जैन कंपनीने मसाले उत्पादन सुरू केले असल्याने मिरचीची मोठ्याप्रमाणावर आवश्यकता असते शेतकऱ्यांनी मिरची, कांदा, टोमॅटो व आल्याचे ही उत्पादन घ्यावे. याबाबत कंपनीचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके यांनी यांनी केले.
करार शेती व शेती व्यवस्थापन याबाबत जैन इरिगेशनचे पांढरा कांदा, टोमॅटो करार शेती विभागाचे प्रमुख गौतम देसर्डा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा कृषि अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली. जमिनीत कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे व काय करायला हवे याबाबत माती परीक्षण करून नेमकेपणाने खते, सूक्ष्म अन्नद्रव्याचे नियोजन करणे यावर भर दिला पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.
ज्यांनी टोमॅटोची लागवड केली असे शिरसोलीचे प्रयोगशील सुरेश अस्वार, युनायटेड जेनेटिक्स प्रा. कंपनीचे व्यंकट पवार, जैन इरिगेशनचे रोशन शहा यांनी सुसंवाद साधला. विजेचा पंप मोबाईवरच नियंत्रीत करता येणारे डिव्हाईस उत्पादक सार्थक कंट्रोल्सचे संचालक रोहनजी यांनी देखील त्यांच्या सार्थक मोबाईल अॅटो डिव्हाईसची सोदाहरण माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम पाटील यांनी तर आभारप्रदर्शन व्ही आर सोळंखी यांनी केले.
या मेळाव्यास शिरसोली, जळके, विटनेर, नशिराबाद, पाचोरा पंचक्रोशीतील स्त्री-पुरुष शेतकरी उपस्थित होते. यांनी आभार मानले. कोरोना काळात दिवंगत झालेल्या व्यक्तींना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कोरोना आव्हानात्मक काळात जैन इरिगेशनचे सार्वजनिक कार्यक्रम बंद होते. हा शेतकऱ्यांसाठी आयोजलेल्या कार्यक्रमात परिसरातील स्त्री व पुरुष शेतकरी आवर्जून उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम