शेतकऱ्यांनो कांद्याचे योग्य नियोजन करा ; कांदा तेजीत

0
20

मुकुंद भडांगे
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; शेतकरी हवालदिल झालेला असतांना सध्या आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे. कारण मागील आठवड्यापासून रोज भावात एक ते दोन रुपयांनी वाढ होत आहे. अचानक जास्त तेजीपेक्षा रोज एक ते दोन रुपयांची स्थायी भाववाढ असते.

किंवा दीर्घकाळ टिकणारी असते .जुना उन्हाळ कांदा जवळपास तीस टक्के शिल्लक आहे.परंतु खराब होण्याचे प्रमाण यंदा दरवर्षी-पेक्षा सततच्या हवामान बदलामुळे अधिक आहे. तसेच नवीन लाल कांद्याचे आगार नांदगाव ,मालेगाव, सटाणा, साक्री,धुळे इत्यादी ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे नवीन लागवड तसेच रोपांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे .

हिच परिस्थिती राजस्थान, मध्येप्रदेश ,आणि दक्षिण भारतात पण आहे त्यामुळे मागील पुरवठा निर्देशांक बघता महिनाभर पुरेल इतका माल शिल्लक असताना दोन ते तीन महिनेची मागणी भागवावी लागणार असल्याने तुटवडा निर्माण होऊन बाजारभाव हमखास वाढण्याची स्थिती आहे.

येत्या काळात पाच हजाराचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. तरी शेतकऱ्यांनी मालाची प्रत बघून टप्याटप्याने विक्री करावी असे मत कांदा व्यापारी दिपक लोकनार यांनी व्यक्त केले आहे.

आपल्या रोजच्या जीवनातील अन्नातील महत्त्वाचा घटक म्हणजे कांदा, मागील आठवड्यापासून कांद्याच्या दरामध्ये हळूहळू का होईना पण दरात वाढ होत आहे .आणि या दर स्थिर राहत आहे येणाऱ्या काळात नक्कीच कांद्याचे भाव वाढणार आहे यात काही शंका नाही.
– दिपक लोकनार
कांदा व्यापारी पिंपळगाव बसवंत


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here