द पॉईंट नाऊ ब्युरो : शेतीला दिवसा वीज द्या, अन्यथा तुमचा वीज खरेदी घोटाळा बाहेर काढू. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.
महाराष्ट्रात शेतकरी वर्गाला शेतीसाठी वेळेवर वीज उपलब्ध होणं हे दुरापास्तच आहे. वीज ही रात्रीच येत असल्याने शेतकरी वर्गाला रात्री-बेरात्री शेतीला पाणी देण्यासाठी उठावे लागते. म्हणावी तशी वेळेवर वीज उपलब्ध होत नाही. यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे आता राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
महावितरण मध्ये वीज वितरण करतांना 25 ते 30 हजार कोटींचा घोटाळा होतो. त्यामुळे शासनाने येत्या 15 दिवसांत योग्य तो निर्णय घेऊन शेतकरी वर्गाला दिवसा वीज उपलब्ध करून दिली नाही, तर जनआंदोलन उभारण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारचे बरेच मोठे नेते सध्या वेगवेगळ्या घोटाळा प्रकरणी रडारवर आहेत. त्यात आता महावितरण मध्ये देखील घोटाळ्याबाबत राजू शेट्टी यांनी वक्तव्य केल्याने, अजून आता हा कोणता घोटाळा? म्हणून नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत.
आता राजू शेट्टी यांच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकार काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम