शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू ; पिकांवर ‘रोटर’ फिरवले , सरकार मात्र ढिम्मच

0
20
विठेवाडी ता देवळा येथे भाव मिळत नसल्याने कोबी पिकावर रोटर मारताना शांताराम निकम व धनाजी निकम आदी (छाया - सोमनाथ जगताप )

सोमनाथ जगताप
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : शेतकरी रडतोय सरकार मात्र अजूनही काही निर्णय घेत नसल्याने शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती झाली आहे. उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी संतप्त झालेला आहे. पुढील पिकांचे नियोजन देखील चुकणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

सद्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने हतबल झालेल्या तालुक्यातील विठेवाडी येथील दोन युवा शेतकऱ्यांनी आपल्या साडे चार एकर क्षेत्रावरील कोबी पिकावर रोटर फिरवला आहे . या पडलेल्या बाजार भावाकडे सरकारचे दुर्लक्ष झाले असून, शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्यात प्रयोगशील शेतकरी वर्ग असून,इतर पीकांबरोबर भाजीपाला वर्गीय पिके घेण्याकडे तो झुकला आहे .

गिरणा नदी काठी वसलेल्या विठेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणावर कोबी लागवड केली आहे. धनाजी देवमण निकम यांनी दोन एकर तर शाताराम शंकर निकम यांनी आडीच एकर क्षेत्रामध्ये कोबीची लागवड केली असून, यासाठी त्यांना प्रत्येकी लाख लाख रुपये खर्च आला आहे. मात्र कोबीला अवघा एक रुपये प्रति किलो भाव मिळत असल्याने त्यांचा खर्च देखील वसूल होणार नासल्याने त्यांनी संपूर्ण पिकावर रोटर फिरवून आपला संताप व्यक्त केला आहे.

विठेवाडी ता देवळा येथे भाव मिळत नसल्याने कोबी पिकावर रोटर मारताना शांताराम निकम व धनाजी निकम आदी छाया सोमनाथ जगताप

टोमॅटो, कोबीसह इतर भाजीपाला पिकाला सद्या बाजार भाव मिळत नाही. संतप्त शेतकरी तयार माल फेकतांना दिसून येत असून , केंद्र व राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याची ओरड शेतकरी वर्ग करीत आहे. कोरोना महामारीपासून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे . त्यात पेट्रोल ,डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्कील झाले आहे. तर दुसरीकडे शेती मालाला मिळत असलेला कवडी मोल भाव या दुहेरी तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

शासनाने याची दखल घेऊन भाजीपाला वर्गीय पिकांना किमान हमी भाव जाहीर करावा ,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे . देवळा तालुक्यात सुरवातीच्या पावसानंतर ओठ दिल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे . गेल्या सप्ताहात झालेल्या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले असून , पावसाने सद्या उघडीप दिल्याने पिके करपू लागली आहेत .

छोटी मोठी पाझर तलाव, धरणे कोरडी ठाक असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. विहित असलेल्या जेमतेम पाण्यावर शेतकरी पिकांना भरून जतन करीत आहे . त्यात भाजीपाला व इतर पिकांना भाव नसलेल्या खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकरी पुरता हतबल झाला असून , उभ्या पिकात रोटर फिरवायची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने शासनाने यांची दखल घ्यावी ,अशी मागणी जोर धरू लागली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here