द पॉईंट नाऊ ब्युरो : शेतकऱ्यासाठी काम करणारे आदर्श अधिकारी म्हणून ख्याती असणारे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांना प्रधान सचिवपदी पदोन्नती देण्यात आली आहे . या नियुक्तीबद्दल सुजाता सौनिक अपर मुख्य सचिव यांनी पत्र दिले आहे. या नियुक्ती मुळे कृषी खात्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पत्रात म्हटले आहे की भारतीय प्रशासन सेवेच्या प्रधान सचिव (Level 15 of the Pay Matrix) दिनांक ०१.०१.२०२२ पासून, सध्याच्याच पदावर स्थानापन्न पदोन्नती देण्यात येत आहे. आपले सध्याचे पद भारतीय प्रशासन सेवेच्या प्रधान सचिव श्रेणीत उन्नत करून त्या पदाचे पदनाम प्रधान सचिव (कृषी), कृषी व पदम विभाग असे करून पुढे चालू ठेवण्यात येत आहे.
एकनाथ डवले हे अतिशय शिस्तप्रिय व कामात पारंगत असल्याने अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांसाठी ते आपलेसे वाटत असल्याने, त्यांच्या निवडीबद्दल सर्व्यांनीच समाधान व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी डवले यांनी विविध प्रयोग केले असून, शेताच्या बांधापर्यंत त्यांचा प्रवास राहिला आहे. पदाचा कुठलाही बडेजाव न बाळगता शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या अडीअडचणी ते समजून घेत असल्याने त्यांची लोकप्रियता शेतकरी वर्गात चांगली आहे. भविष्यात कृषी क्षेत्रात बदल घडवण्यासाठी विशेष प्रयत्न त्यांच्या मार्फत राबविले जाणार असल्याने शेतकरी पुन्हा त्यांच्या निवडीने सुखावला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम