शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती काही बदलेना..

0
17

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : भारताला कृषिप्रधान देश संबोधले जाते. मात्र या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा मोठा गंभीर प्रश्न आहे.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा भयावह करणारा आहे. सरत्या 2021 या वर्षाची आकडेवारी पाहिली असता, हे चित्र समोर आले आहे. महाराष्ट्रा मध्ये एकट्या मराठवाड्यात गेल्या वर्षभरात 800 हुन अधिक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राचा मोठा हातभार आहे. भारतात शेतकरी वर्गाची संख्या मोठी आहे. परंतु, अस्मानी – सुलतानी संकटांनी या शेतकरी वर्गाला नेहमीच त्रस्त केले आहे.

शेतकरी मोठ्या उमेदीने कर्ज काढून शेतात पीक पिकवतो. मात्र त्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. 2020 आणि 2021 या वर्षात आधी कोरोना आणि नंतर अवकाळी पाऊस अशा दोघा संकटांनी शेतकऱ्याला पूर्णतः उध्वस्त केले.

शासनाने याच कारणास्तव मागील दोन वर्षात कर्जमाफी देखील दिली. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबलेल्या नाहीत. मागील वर्षभरातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा हा आकडा भयभीत करणारा आणि शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती दर्शवणारा आहे.

2020 साली आधी कोरोनाने सर्वांसोबतच शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर हाल केले. त्यानंतर 2021 या वर्षात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संकटात अजूनही धीर मिळालेला नाही.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here