विज बिल व वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ऊर्जा राज्यमंत्र्यांना साकडे

0
22

नाशिक प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांची इगतपुरी तालुक्यातील धामणगांव येथील सरपंच शिवाजी गाढवे, पांडुरंग गाढवे, निवृत्ती जाधव, सुनिल गाढवे यांनी रविवारी राहुरी येथील वरशिंदे गावात वीज मंडळाच्या इगतपुरी तालुक्यातील ७ ते ८ ग्रामपंचायततीचे ठराव असलेल्या समस्यांबाबत भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळेस शेतकऱ्यांनी इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो येथे धरणे भरलेले असताना सुद्धा हक्काच्या पाण्याचा आम्हाला उपयोग होत नाही, कारण वीज पुरवठा सुरळीत नाही,पावसाळ्यात आमच्या भात शेतीमुळे चार महिने वीज पंप बंद असतात. त्यामुळे आम्हाला हंगामी वीजबिल आकारणी करावी, ३३ केव्ही धामणगांव साकुर ता.ईगतपुरी सब स्टेशन अंतर्गत शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी येतात.शासनाने जाहीर केलेल्या लोडशेडिंगच्या व्यतिरिक्त अतिरिक्त लोडशेडिंग केले जाते तसेच शेतात अनेक विजेच्या तारा लोंबकळलेल्या अवस्थेत असून ऊस शेतीचे शॉक सर्किटमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सध्याच्या परिस्थितीत शासनाच्या विज बिल वसुलीमुळे आमच्या परिसरातील ट्रांसफार्मर बंद केल्यामुळे आमचे भाजीपाला पीक नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही. खापराळे सिन्नर ते साकुर येणारी ३३ केव्ही नवीन लाईन लवकरात लवकर सुरू करावी. यावेळेस राज्यमंत्री यांनी त्वरित नाशिक विभागाचे एक्झिक्यूटिव्ह श्री. डोंगरे साहेब यांच्याशी संपर्क साधून चालू बिलासंदर्भात व विविध विषयावर चर्चा झाली.

वीज बिलाच्या संदर्भातील प्रश्न गंभीर असून शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याची आवश्यकता असून इथून पुढे निवेदनातील ज्या महत्त्वाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी थोड्याच दिवसात मंत्रालयात आमदार माणिकराव कोकाटे ,आमदार हिरामण खोसकर ,संबंधित अधिकारी व शेतकऱ्यांच्या समवेत बैठक आयोजित करू.
प्राजक्त तनपुरे
उर्जा राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य

भविष्यात विजेचा प्रश्न सोडवायचा असेल तर सोलर सबस्टेशन उत्तम पर्याय असून शासन यासंदर्भात महत्वाचे पाऊल उचलत असून, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here