प्रसाद बैरागी
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; संपूर्ण अशिया खंडात कांदा आणि लासलगाव शहर यांचे वेगळेच नाते आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव चा कांदा हा जगात प्रसिद्ध आहे. या कांद्यामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव शहराला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली आहे.
लासलगाव च्या चवदार कांद्याला नुकतेच जी आय मानांकन प्राप्त झाले आहे. अशा या लासलगाव च्या जगप्रसिद्ध कांद्याला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी टपाल विभागाच्या वतीने “लासलगाव प्याज” या विशेष टपाल पाकिटाचे अनावरण लासलगाव पोस्ट विभागाच्या कार्यालयात करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या कांद्याला अजून आंतरराष्ट्रीय स्थळावर ऐतिहासिक व पारंपरिक मूल्य प्राप्त व्हावे, तसेच जागतिक स्तरावर हा कांदा पोहोचावा यासाठी तसेच हा वारसा जतन करण्यासाठी भारतीय टपाल विभागाने पुढाकार घेत “लासलगाव प्याज” हे विशेष टपाल पाकीट काढले असल्याची माहिती मालेगाव पोस्ट विभागाचे अधीक्षक नितीन येवला यांनी टपाल अनावरण प्रसंगी माहिती दिली.
लासलगाव पोस्ट कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात “लासलगाव प्याज” या विशेष टपाल पाकिटाचे अनावरण मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा लासलगाव ग्रामपंचायत चे सरपंच जयदत्त होळकर, लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप,मालेगाव पोस्ट विभागाचे अधीक्षक नितीन येवला, लासलगाव व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष नंदकुमार डागा, बळीराजा गट चे अध्यक्ष राहुल पाटील, बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे,लासलगाव चे स पो नि राहुल वाघ, कांदा व्यापारी हेमंत राका यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी जयदत्त होळकर, सुवर्णा जगताप,राहुल पाटील, नंदकुमार डागा तसेच कांदा व्यापारी हेमंत राका यांनी मनोगत व्यक्त करतांना टपाल विभागाने नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी” लासलगाव प्याज” या विशेष टपाल पाकिटाचे प्रकाशन केले हे कौतुकास्पद असून निश्चित नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे नाव या टपाल पाकिटाद्वारे जगात जाणार असल्याने या उपक्रमाचे कौतुक करून पोस्ट विभागाचे विशेष अभिनंदन करून जयदत्त होळकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोस्ट विभागाचे संदीप रेपे यांनी केले तर आभार पंकज दुसाने, डाक निरीक्षक मनमाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र वानखेडे, डाक निरीक्षक चांदवड, शांताराम हरकल पोस्ट मास्तर लासलगाव, डी आर दिवेकर, डाक अवेक्षक चांदवड तसेच सर्व लासलगाव पोस्ट विभागातील कर्मचारी व शाखा डाकपाल व अल्पबचत प्रतिनिधी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम