लाचखोर ‘झनकरांची’ संपत्ती डोळे दिपवणारी ; तुम्ही व्हाल ‘अवाक’

1
15

नाशिक प्रतिनिधी : भ्रष्टाचारी वादग्रस्त, लाचखोर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर झनकर फरार झाल्यात. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या नावावर मालमत्ता बघून पोलिसही आवाक झाले आहेत. एखाद्या अधिकाऱ्यांची मोक्याच्या जागेवर संपत्ती कशी घेतली हे नवीन सांगायला नको अशी परिस्थिती. झनकर यांची संपत्ती लाखोंच्या घरात असून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ही संपत्ती जमवल्याची चर्चा आहे.

लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ. झनकर यांच्या नावे शहरातील शिवाजीनगर , गंगापूर रोड मुरबाड, गंधारे कल्याण असे प्रत्येकी एक याप्रमाणे चार फ्लॅट तसेच सिन्नरमध्ये 0.57 गुंठे, कल्याण येथील मिलिंदनगरमध्ये 31.70 गुंठे, 10.8 गुंठे, 40.80 गुंठे, 13.10 गुंठे तर सिन्नरमध्ये 0.56 गुंठे, 3.41 गुंठे, 22.70 गुंठे अशी एकूण सुमारे 123.64 गुंठे अर्थात सर्व मिळूण एकूण 3 एकर अशी स्थावर मालमत्ता आहे. तसेच 40 हजारांची रोख रक्कम, एक होंडा सिटी कार, आणि अ‍ॅक्टिव्हा दुचाकी अशी वाहने पोलिसांना आढळून आली आहेत. ही संपत्ती बघुन पोलिसही आवाक झाले आहेत. सध्या झनकर यांची संपत्ती बघून एका नोकरीवर इतकी संपत्ती कशा प्रकारे जमा होऊ शकते हा देखील चर्चेचा विषय आहे.

आज झालेल्या घराच्या झाडाझडतीत अधिकाऱ्यांनी एसबीआय, बँक ऑफ बडोदा, सिटी युनियन बँक, पंजाब नॅशनल बँकेसह इत्यादी बँकांचे पासबुक जप्त केलेत. याच दरम्यान पथकानं शासकीय चालक ज्ञानेश्वर सूर्यभान येवले, प्राथमिक शाळेतील शिक्षक पंकज रमेश दशपुते यांच्याही घराची झडती घेतली.

 

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

  1. झनकर बाई समाजाला कलक आहे तिच्या बरोबरच्या सर्वाचीच चौकशी ह्यालाच पाहीजेत उपाशानी पण काही कमी नाहीत या हारमखौरना एवढा पगार असुन याचे पोट भरत नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here