लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी गेलेल्या तरूणीचे अपहरण; महिनाभर नराधमांनी केला बलात्कार

0
22

मध्यप्रदेशमधील झांशी येथे धक्कादायक प्रकार घडला असून समजला काळीमा फासणारी ही घटना आहे. लग्नपत्रिका द्यायला गेली असता एका १८ वर्षाच्या तरुणीचे अपहरण करून नराधमांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

मध्यप्रदेशमधील झांशी जिल्ह्यात १८ एप्रिल रोजी पिडीत तरुणी आपल्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी एका गावात गेली असताना गावातील तीन तरुण नराधमांनी तीचे अपहरण केलं होतं. अपहरण करून तीला निर्जनस्थळी घेऊन जाऊन तीचावर सामुहिक बलात्कार करण्यात येत होता. तीनही नराधमांनी काही दिवस आळीपाळीने बलात्कार करत होत.

एकाच गावात नराधमांनी पिडितेला एका स्थानिक नेत्याकडे सूपुर्द केले होते. झाशी जिल्ह्यात स्थानिक नेत्यांनी तरूणीवर एका ठिकाणी ठेऊन वारंवार बलात्कार केला. पुन्हा एकदा तरूणीला स्थानिक नेत्याने दाटिया जिल्ह्यातील एका व्यक्तीकडे सुपूर्द केलं .हा सर्व प्रकार जवळपास महिनाभर चालू होता .

तरूणीने संधीचा फायदा घेत एका दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने कुटुंबीयांना फोन लावला आणि नराधमांच्या तावडीतून सुटका करुन घेतली होती. तरूणीने काही दिवसात पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेहरौली मंडळ अधिकारी अनुज सिंह पोलिस आरोपींचा शोध घेत असून त्यांच्यावक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं आहे

 

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here