रानवड साखर कारखान्यासाठी ९०० हेक्टर उसाची नोंद

0
22

द पॉईंट प्रतिनिधी: काही वर्षांपासून निफाड तालुक्यातील तीनही साखर कारखाने बंद असल्याने बाहेरील जिल्ह्यातील कारखान्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू होती. तालुक्यातील कारखाने सुरू व्हावे ही तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सत्यत्याने मागणी होती.

महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ततालुक्यातील अवसायनात असलेला रानवड सहकारी साखर कारखाना हा आमदार दिलीपराव बनकर यांच्या अधिपत्याखाली असलेल्या स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेने पुढील १५ वर्षांसाठी भाडेतत्वावर चालविण्यास घेतला असून सदर कारखान्याचा पुढील हंगामासाठी दि.१ ऑगस्टपासून ऊस नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. त्यानुसार आजपावेतो सुमारे ९०० हेक्टरवरील उसाची नोंदणी करण्यात आलेली आहे.

यामध्ये ८६०३२ ऊसाची जातीच्या सुमारे ७०० हेक्टर तर ३१०२ उसाची जातीच्या सुमारे १०० हेक्टर, ८००२ ऊसाची जातीच्या सुमारे ५० हेक्टर व २६५ ऊसाची जातीच्या सुमारे ५० हेक्टर शेतकऱ्यांनी ऊसाची नोंद केलेली आहे.


वरील सर्व जातीच्या आडसाली ऊसाची प्राधान्यक्रमाने नोंदणी करून ऊस तोडणी केली जाणार असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ माळोदे यांनी दिली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here