नाशिक प्रतिनिधी : कोरोना काळात बिटको कोविड हॉस्पिटल मध्ये, तोडफोड करून धुमाकूळ घालणाऱ्या भाजपा नगरसेवकपती. राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
कोणामुळे रुग्णांना बेड भेटत नसतांना, नाशिक येथील बिटको कोविड सेंटरमध्ये रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही. तसेच रेमीडेसीवर इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे असा आरोप करत, गलथान कारभाराच्या निषेधार्थ भाजपा नगरसेविका, डॉ.सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे , यांनी बिटको कोविड सेंटरच्या काचेच्या प्रवेशद्वारातून इनिव्हा गाडी घुसवून, नुकसान केले होते. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संतप्त झालेल्या ताजने यांनी डॉक्टरांच्या दिशेने पेवर ब्लॉक भिरकावला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात ताजणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. प्रकार घडल्यापासून ताजणे हा फरारी होता. शहरातील पोलीस दल त्याचा शोध घेत होते. गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली होती. नुकतेच मागील आठवड्यामध्ये ताजने हा पोलिसांना शरण आला होते. त्यांना अटक करून दोन दिवसाची पोलीस कोठडी घेण्यात आली होती.
ताजने यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर ताजणे यांच्यावतीने जिल्हा सत्र न्यायालयमध्ये जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने वकिलाचा युक्तिवाद लक्षात घेऊन अटी व शर्थी ठेवून ताजणे यांना जामीन मंजूर केला आहे. ताजने यांचे वकील म्हणून अमित प्रधान यांनी काम बघितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम