नाशकात कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित.

0
27

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : नाशिकातील ओझर विमानतळावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नुकतेच आगमन झाले आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ , कृषी मंत्री दादा भुसे  यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यपालांचे विमानतळावर स्वागत केले.

कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,  विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर-पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी.  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्यासह प्रमुख वरिष्ठ अधिकारीही राज्यपाल कोश्यारी यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी ह महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात (MUHS) आयोजित राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित आहेत. ते ह्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी रवाना झाले आहेत.

 

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here