रसिका एम.एस्सी.कृषी त मराठवाडा विद्यापीठातून सुवर्ण पदकाची मानकरी

0
39
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील दीक्षांत समारंभात सुवर्णपदक स्वीकारतांना रसिका आहेर.

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळ्याची कन्या रसिका राजेद्र आहेर एम. एस्सी.कृषी जैव तंत्रज्ञान या अभ्यासक्रमात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून विद्यापीठातुन प्रथम क्रमांक पटकावला व सुवर्णपदकाची मानकरी ठरली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील दीक्षांत समारंभात सुवर्णपदक स्वीकारतांना रसिका आहेर.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी येथून सटाणा येथील रसिका राजेंद्र आहेर ही. मास्टर ऑफ सायन्स अग्रिकल्चरल बायोटेक या शाखेतून सुवर्णपदकाची मानकरी ठरली. प्रभारी कुलगुरू तथा महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, कुलगुरू डॉ.अशोक ढवण, माजी कुलगुरू डॉ.गोरे व इतर मान्यवरांच्या हस्ते नुकत्याच विद्यापीठाच्या २३ व्या दिक्षांत सोहळ्याप्रसंगी प्रदान करण्यात आले.

रसिका सद्या इंटरनॅशनल क्रॉपस रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी एरीड ट्रॉपिक्स हैदराबाद येथे संशोधन पीएचडी करत आहे. के. के.वाघ कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातून पदवी मिळवली असून, सध्या उस्मानिया विद्यापीठ हैद्राबाद व संयुक्त राष्ट्र संघाचे इंटरनॅशनल क्रॉपस रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी एरिड ट्रॉपिकस येथे ती पी.एच डी. करीत आहे.

या संशोधनानिमित अमेरिका येथील जॉनसन स्थित कॉर्टिवा या कंपनीत तसेच मोहाली चंदिगड, येथील नॅशनल ऍग्री-फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट येथील प्रयोगशाळेत संशोधन करत आहे.

कळवण कॉलेजचे प्राध्यापक राजेंद्र आहेर व प्राथमिक शिक्षिका प्रतिभा नवले-आहेर यांची ती कन्या आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

– सोमनाथ जगताप

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here