रखरखत्या उन्हाचा केळी बागांवर मोठा फटका

0
19

केळी बागा येत्या काही वर्षांत नाहीशी होईल, यांची चिंता व्यक्त केली जाते.  जगभरातच वाढत्या तापमानामुळे केळीवर संकट ओढवलं आहे. परंतु सगळ्यात मोठा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. आधीच केळीस भाव नसल्याने शेतकरी संकटात सापडला त्यातच नैसर्गिक परीस्थितीमुळे शेतकरी आणखीन संकटात सापडला आहे.

यंदाच्या कडक उन्हामुळे केळी उत्पादक चांगलाच होरपळून निघाला आहे. शेतात असलेली उभी केळी  उन्हाने अक्षरशः कोमेजत आहे. अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान, वादळी वाऱ्यामुळे गळून पडणारे केळी यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होऊन संकटात सापडला आहे.

जगात केळीचे सगळ्यात जास्त उत्पादन आणि खप भारतातच होतो. विविध भागातून शेतकरयांनी नाराजी व्यक्त केली. केळी फळाचे उत्पादन काही दिवसांनी नाहीशी होणार मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले, याला कारण बदलत हवामान . जगात केळीचे सगळ्यात जास्त उत्पादन आणि खप भारतातच होतो.

देशातील केळीच्या व्यावसायिक उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 50 टक्‍के आहे. कृषी तज्ञांच्या मते बदलत्या हवामानात टिकाव धरून ठेवण्याची क्षमता केळी पिकामध्ये नाही. काही भागात केळी काढणीस उशीर होण्याचा अंदाज आहे. तर काही देशांत काढणी उलटण्याची शक्यता आहे.अनेक देशांत २०५० नंतर केळीच्या उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here