येवला तालुक्यातील धक्कादायक प्रकार ; बापाने केली मुलाची हत्या 

0
19

येवला तालुक्यातील कातरणी येथे नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. वडीलांनीच पोटच्या मुलाचा खून केल्याची घटना घडली. घटना कळता पोलिसांनी वडील बाळासाहेब अण्णासाहेब आगवणे (वय ५०) यांना अटक केली आहे.

कातरणी येथे कातरणी ते समीट रेल्वे स्थानकाकडे जाणा-या रोडवर घडली.या घटनेत मृत झालेल्या मुलाचे नाव संदीप बाळासाहेब आगवणे (वय ३२) असे आहे. कौटुंबिक कारणातून वडील व मुलांमध्ये झालेल्या भांडण टोकाला पोहोचले. राग न आवरल्याने पोटच्या मुलाचा खून केला. या भांडणात वडीलांनी मुलास डोक्यावरुन उचलून आपटल्याने त्यांच्या डोक्यातून रक्तश्राव झाल्याने त्याला मरण आले.

संदीप हा रात्री दारु पिऊन आला त्याने वडील बाळासाहेब अण्णासाहेब आगवणे यांच्याशी वाद केले. “तुम्ही माझे चांगल्या मुलीशी लग्न लाऊन न दिल्याने ती घर सोडून गेली” या वादावरून टोकाचे पाऊल उचलले गेले. त्यातून ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी भांदवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहे.

 

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here